डॉ. चंद्रकांत धांडे - लेख सूची

श्री. अनंतराव भालेराव

दि. २६ ऑक्टोबर १९९१ रोजी श्री. अनंतराव भालेराव यांचे निधन झाले. पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक धगधगते यज्ञकुंड शांत झाले. अनंतरावांचा जन्म खंडाळा, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद येथे १४ नोव्हेंबर १९९१ या दिवशी झाला. त्यांचे वडील काशीनाथबुवा वारकरी होते. शिवूरच्या शंकरस्वामी मठातील फडाचे ते प्रमुख होते. वैजापूर, गंगापूर आणि औरंगाबाद येथे शिकून १९३६मध्ये अनंतराव मॅट्रिकची परीक्षा पास …

विदर्भातील पुरोगामी विदुषी – कै. प्रा. मनू गंगाधर नातू

माझे औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयातील गुरू डॉ. भालचंद्र फडके मला १९६६ मध्ये अमरावती येथील विदर्भ महाविद्यालयातील मराठी विभागाच्या प्रमुख प्रो. श्रीमती म. गं. नातू यांच्याकडे घेऊन गेले. डॉ. भालचंद्र फडके यांनी माझी हमी घेतल्यामुळे बाईंनी मला पीएच्. डी. करिता मार्गदर्शन करण्याचे मान्य केले. मी विदर्भातील नोकरी सोडून पैठणला आलो. १९७६ मध्ये मला पीएच्. डी. मिळाली. …